सुवर्णप्राशन संस्कारासाठी तुम्ही तुमच्या बाळाची निवड केल्याबददल सुवर्णप्राशन परिवारातर्फे तुमचे अभिनंदन.
सुवर्णप्राशनम होतन्मेधाग्निबलवर्धनम | आयुष्य मंगलम पुण्यं वृष्य वर्ण्य ग्रहापहम | मासात परमेधावी व्याधिभिर्न च धृष्यते |
षडभिमसिःश्रृतधरः सुवर्णप्राश्नाग्दवेत || का.सं. सू. लेहनाध्याय
सुवर्णप्राशन हे बुध्दि अग्नि भुक व बल यांची वृध्दि करणारे आयुष्य वाढवणारे आहे कल्याणकारक पुण्यकारक शरिराचा वर्ण सुधारणारे बालकातील ग्रहबाधा दुर करणारे असे आहे.
सुवर्णप्राश संस्कार दर पुष्य नक्षत्राला करावा किंवा दररोज ६महिण्यापर्यंत करावा वयाच्या १२ ते १४ वर्षापर्यंत करावा.
मुलांचा आहार
जन्मापासुन किमान सहा महिन्यापर्यंत फक्त आईचे दुध द्यावे. त्यानंतर वर्षापर्यत इतर अन्नासह दुध द्यावे. आईचे दुध कमी पडत असेल मूल रडत असेल वजन वाढत नसेल किंवा मूल झोपत नसेल तर गाईचे दुध पुढिल पध्दतीने द्यावे
मुल ४ महिण्याचे होईपर्यंत दुध १ कप पाणी अर्धा कप व सुंठ बारीक तुकडा आणि वावडिंग ४दाणे असे उकळुन द्यावे. पाण्याचे प्रमाण नंतर कमी करावे. किमान २ ते ३ तासानंतर मुलाला दुध द्यावे. उन्हाळा असेल तरच बाळाला २ ते ४ चमचे पाणी द्यावे. उकळताना बाळंतशेपा वावडिंग घालावे.
४ महिण्यानंतर दुध कमी पडत असल्यास खारिक बदाम जर्दाळु प्रत्येकी ३० वेढे मधात उगाळुन दिवसातुन १ वेळा द्यावे.
• सुवर्ण किंवा सुवर्णवचा १० ते ३० वळसे १चमचा मध व अर्धा चमचा तुप जन्मानंतर बाळाला १ वर्षाचा होइपर्यंत द्यावे.
बाळगुटि किंवा बालामृत किंवा वजामृत १० व्या दिवसापासुन द्यावी आईच्या दुधात किंवा मधासह द्यावी प्रत्येक औषध सुरवातीला १ वळसा द्यावे.
आई दिवसभर घरात नसेल नोकरी करत असेल किंवा मुलाला दुध कमी पडत असेल तर ६व्या महिण्यापासुन क्वचित ४ थ्या महिण्यापासुन बाळाला पेज द्यावी चमचाभर ३ ग्रम तांदुळ भाजुन १६पट पाण्यात तांदुळ फुटेपर्यंत मऊ शिजवावे त्याचे वरचे पाणी मीठ साखर तुप घालुन द्यावे.
बाळ बसु लागल्यावर त्याला बसुनच जेवु घालावे ८ ९ महिन्यात मऊ वरण भात कमी तिखट आमटि भाजी भातात घालुन तो भात धावा चांगल्या तुपातील शिरा उपमा नाचणीची खीर राजगीरा खीर मुगाच्या डाळीची खिचडी कमी तिखट द्यावी.
१० व्या महिण्यानंतर मूल चांगले बसते उभे राहते दात आलेले असतात खेळ व्यायाम भरपुर होतो त्यामुळे आहाराचे प्रमाण वाढवावे. सकाळी दुध १० वा. खीर पेज शिरा इ. नाष्टा धावा १२ ते १ या वरण भात, पोळी तुप दुध साखर भाजी आमटि या पैकि काहितरी द्यावे दुपारी १ वा. दुध व एकदा खाणे द्यावे. रात्री परत गरम वरण भात फुलका किंवा भाकरी द्यावी ३ ४ वेळा मुद्याम पाणी पाजावे.
दात आल्यावर बसता आल्यावर मुलासमोर खाऊ ठेवावा ते हाताने उचलुन बरोबर खाऊ तोंडात घालते. या खाऊमध्ये प्रामुख्याने पुढिल पदार्थ द्यावेत.
साळीच्या लाहया किंवा त्याचा विवडा साखर फुटाणे भाजके पोहे, मनुका खोबरे बेदाणे खारीक डाळ भाजलेली खडिसाखर फुटाणे ज्वारीच्या लाहया, राजगिरा लाडु कणकेचा लाडु मुगाचा लाडु शेंगदाणे गुळ
प्रीणन मोदक चावुन खायु शकणा-या मुलाला हे करून दयावे. साळीच्या लाह्या भाजुन त्याचे पीठ करावे. ते चांगल्या तुपावर भाजावे त्यात चारोळी बदाम खोबर खारीक सुंठ जेष्ठमध पिंपळी घालावी साखरेच्या पाकात हे सर्व घालुन छोटे छोटे लाडु करावेत व मुलाला रोज द्यावे हे लाडु औषधी पौष्टिक पचनाला चांगले असतात. असे लाडु पाक न करता नुसती पीठीसाखर घालुन सुध्दा होऊ शकतात.
एक दीड वर्षापर्यत मुलाला वरील आहार पुरेसा होतो. गरजेनुसार त्यात आपण पुढे मागे करू शकतो दीड वर्षापासुन मूल. सर्व अन्नपदार्थ खावु शकतो लोणचे चटणी मसालेदार पदार्थ देवु नयेत.
ज्या मुलांचे वजन जन्मतः कमी असते त्यांना सोने तुप मध द्यावे. पाणी उकळताना त्यात चोख सोनं घालुन ते अर्धे करावे व ते बाळाला द्यावे यामुळे वजन वाढते, अग्नि वाढतो, प्रतिकार शक्ति वाढते.
फळापैकी केळी पेरू फार देवु नयेत. मोसंबी डाळींब पपई चिक्कु सफरचंद द्यावे. कफाची प्रवृत्ती असलेल्यांनी फळे कमीच खावीत.
दही लहान मुलांना देवु नये क्वचित दिल्यास साखर मध घालुन दयावे दूध भात दिल्यास त्यात मीठ न घालता साखर घालावी.
सर्दी खोकला झाल्यास मुलाला जरूर आलं घातलेला चहा द्यावा दूध देवु नये.
सर्दी सारखी होत असल्यास पिंपळी चुण घालुन दुध घ्यावे.
दात येताना होणा-या त्रासासाठी वैद्यकिय सल्ल्यावरून आहारात योग्य तो बदल करावा.
दुधात बोर्नविटा, सेरेलॅक, काम्पल्यान, साखरे ऐवजी शतावरी कल्प अनंता कल्प घालावा त्याने वजन चांगले वाढते.
झोप :- रात्री १० पुर्वी झोपावे सकाळी ६ पुर्वी उठावे.
पाणी :- एकदा उकळुन घ्यावे व दिवस रात्र तेच प्यावे, फिल्टर चे पाणी असले तरी ते उकळुनच घ्यावे. कोमट पिल्यास उत्तम. उकळलेले पाणी साध्या भांडयात ठेवावे फिज किंवा माठात ठेवु नये.
जेवण :- छान भुक लागल्यानंतर सकाळी ८ ते ११.३० व सायंकाळी ५.३० ते ८.३० च्या दरम्यान घरचा सम्पुर्ण आहार घ्यावा. डाळ भात भाजी चपाती, दोनच वेळा जेवन करावे इतर वेळेत वरिल पदार्थ तसेच तुप साखर चपाती, तुप साखर भात, डाळ भात. ख्याचा शिरा लाइया असे हलके अन्न घ्यावे जेवताना शांत प्रसन्नचिताने अन्नाला नावे न ठेवता, पुर्ण चाऊन घाई गडबडन करता थोडिशी भुक ठेवुन जेवन करावे. जेवणाच्या सुरवातीला व शेवटि ढसाढसा पाणी पिवु नये. प्रत्येक एक दोन घासानंतर घोटभर पाणी प्यावे इतरवेळी तहान लागल्याशिवाय उगीचच पाणी पिणे टाळावे. जेवल्यानंतर १०० पायले चालुन डाव्या कुशीवर १५ मिनिटे पडून राहावे.
खालील गोष्टि टाळाव्यात :- पनीर हिरवीमिरची, साबुदाना, पोहे, उपीट, चहाचपाती, दुधचपाती, चहाबिस्किट चहा खारी च वेकरी पदार्थ दुध बोर्नविटा, दुध फळे शिकरण, बरतुन मीठ घेणे, मेंगी, कुरकुरे, पापड, लोणचे, इडली, डोसा, समोसा, बडा, भजी, फरसाण, भेळ
मिसळ, केक, बिस्किट, चॉकलेट, सॅण्डविच, पिझ्झा, बर्गर, चायनीज, उसाचा रस, बर्फ, आइस्किम, आंबवलेले बाहेरचे शिळे, उघडयावरचे भेसळयुक्त अन्न पुर्णपणे नकोच. लोणी गावराण तुप चालेल.
थोडक्यात पण महत्वाचे :- वरिल सर्व गोष्टि हे लादलेले नियम नसुन तुमच्या शरिराची गरज आहे तुमचे पाल्य निरोगी राहावे त्याची शारिरीक व बौध्दिक वाढ चांगली व्हावी यासाठी वरिल सगळ्या गोष्टि करणे गरजेचे आहे ताप, सर्दि खोकला, भुकेच्या तकारी, पोटाच्या तकारी त्वचेचे आजार बौध्दिक वाढीसाठी शारिरीक वाढीसाठी उंची वाढवणे, वजन नियमित करणे, झोपेत मुत्रप्रवृत्ती होणे जंत यासर्व आजारांवर आयुर्वेदिक उपचाराने निश्चितच फायदा होतो. केमीकल औषधे अॅटिबायोटिक पेक्षा आयुर्वेदिक उपचार हा निश्चितच फलदायी व मुळीपासुन बरे करण्यास मदत करते.